Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नशिबानं कमावलं पण स्वभावानं गमावलं; राणू मंडल पुन्हा स्टेशनवर गाणार

दि . 06/03/2020

मुंबई: ती आली…आपल्या आवाजाने तिने सर्वांची मन जिंकली, आणि रातोरात स्टार झाली मात्र आज तिच्यावर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ आली. राणू मंडल यांचा प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या आवाजाला चांगलीच दाद मिळाली. त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यांना बॉलिवडू चित्रपटात गाणं गायची संधी देखील मिळाली. मात्र नशिबानं कमावलेलं राणू मंडल यांना स्वभावामुळे गमवावं लागलं, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

राणू मंडल यांनी आपल्या चाहत्यांना चुकीच्या पद्धतीने ट्रीट केल्यामुळे प्रेक्षक वर्गात त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. चाहत्यांसोबत गैरवर्तन करणे, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं, या सर्व चुकांमुळे राणू मंडल पुन्हा स्टेशनवर गाणार असल्याचे बोलल्या जात आहे.


ताज्या बातम्या