Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुंगसे येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट , एक जखमी ; ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान..

दि . 06/03/2020

मालेगाव :- तालुक्यातील मुंगसे येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला असून यात सुमारे ७ तर ८ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

तालुक्यातील मूंगसे येथे काल गुरुवार दि.५ रोजी 
दगाजी संतोष सूर्यवंशी यांच्या राहत्या घरात सायंकाळी ७ वा. सुमारास घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की यात घराच्या चारही भिंती कोसळल्या आहेत. सुदैवाने यावेळी घरातील सदस्य बाहेर असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र दगाजी यांची लग्न ठरलेली मुलगी लीना दगाजी सुर्यवंशी (१९) ही जखमी झाली आहे. तिला उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगाजी यांची मुलगी लीना हीचे लग्न ठरल्याने  घरात कांदे विक्रीचे पैसे ठेवले होते. या स्फोटात त्यांचे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब यामुळे रस्त्यावर आले आहे.


ताज्या बातम्या