Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोयगाव मार्केट- डोळ्यात मिरची पावडर फेकून पैशाची बॅग लंपास...

दि . 06/03/2020

मालेगाव । येथील सटाणा नाका भाग- तील श्रीकृष्ण कॉलनी सोयगाव मार्केट जवळ तीन अनोळखी भामट्यांनी ४८ वर्षीय साहेबराव वडगे या नोकरदाराचे डोळ्यात मिरचीची पावडर फेकून त्याचे जवळील १२ हजाराची रोख रक्कम बँकेचे धनादेश व महत्वाची बिले कागदपत्रे असलेली बॅग बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
या प्रकरणी कॅम्प भागातील प्रयास हॉस्पिटल जवळ राहाणारे साहेबराव पंडीत वडगे यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत फिर्यादी हे त्यांच्या मालकिची प्लॅटीना मोटारसायकल क्र.एमएच ४१ एपी ००५२ हीचे बरुन एमजी किराणा मार्केट सोयगाव येथील व्यापाऱ्यांकडून वसुली करुन १२ हजार ५०० रुपयाची रोख रक्कम अॅक्सीस बँकेचा धनादेश, खतावणी बीले, डायरी असे असलेली काळी बॅग घेवून सोयगाव मार्केट मधून सटाणानाक्याकडे जात असताना तीन अनोळखी भामट्यांनी फिर्यादीचे पाठीमागून येवून त्यांचे डोळ्यावर मिरची पावडर फेकून पैशाची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेले म्हणून भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.


ताज्या बातम्या