Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सप्तश्रृंगी गडावर युवतीचा विनयभंग,एकास अटक...

दि . 06/03/2020

समशंगगडावर दर्शनासाठी आलेल्या एका युवतीचा विनयभंग करणाऱ्या धटिंगण कळवण पोलिसांनी अटक केली. देवीच्या गडावरील शिवालय तलावाजवळ हा प्रकार घडला.
या संदर्भात सदर पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ती आपल्या कुटुंबियासह देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर आली होती. याच दरम्यान विकास लक्ष्मण लेवे (३५) रा. शिर्डी येथे नेऊन याने पीडित मुलीच्या अंगलट येऊन अश्लील चाळे केले. तसेच तिचा इतर ठिकाणी पाठलाग करून त्रास दिला, पोलिसांनी या प्रकरणी विकास लेवे यास अटक करीत त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वाघ हे तपास करीत आहेत.


ताज्या बातम्या