Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण ८ मार्चला

दि . 06/03/2020

मालेगावला विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्थांचा सत्कार

मालेगाव, ता. ५ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती महाराष्ट्र शाखा व अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीतर्फे मालेगाव राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त होणार आहे. राज्यातील ३५ स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. पुरस्कारार्थीचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. ही माहिती स्मारक समितीचे समन्वयक अमोल निकम व अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
पुरस्कारार्थीमध्ये 'सकाळ'चे मालेगाव बातमीदार प्रमोद सावंत, माध्यमिक शिक्षक विजय पाटील,पत्रकार मनोहर शेवाळे, हवालदार भगीरथ सोनवणे, आम्ही मालेगावकर
विधायक संघर्ष समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ, दाभाडी, राज्य प्राथमिक शिक्षक संघ,मालेगाव, परिवर्तन महिला मंडळ,मालेगाव आदींसह राज्यातील विविध
संस्था आणि व्यक्तींचा समावेश आहे.
शहरातील सटाणा नाका भागातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय,अॅरोमा स्टॉप येथे ८ मार्चला सकाळी अकराला कृषिमंत्री दादा भुसे, माजी केंद्रीय दळणवळणमंत्री अॅडव्होकेट विजय नवल पाटील यांच्या उपस्थितीत
पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.पंचायत समितीच्या सभापती सुवर्णादेसाई अध्यक्षस्थानी असतील.
कार्यक्रमास उपमहापौर नीलेश आहेर,अपर पोलिस
अधीक्षक संदीप घुगे,छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे
अॅडव्होकेट बी. के. शिंदे, ओम देशमुख, सुनील गरुड, उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण,नगरसेविका ज्योती भोसले, अहिराणी गझलकार अजय विरारी, प्राप्तिकर अधिकारी भास्कर शिंदे, अशोक शिंदे, रंजन खरोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा गोपनारायण, मॉलिवूड कलाकार अक्रम खान,शफीक अहमद
ऊर्फ छोटू उस्ताद आदी प्रमुख पाहुणे
असतील. या सोहळ्यास उपस्थित
राहावे, असे आवाहन श्री. निकम व
शिंदे यांनी केले आहे.

पुरस्कारार्थीची नावे :
सामाजिक : विजया मानमोडे (पुणे),जितेंद्र बहारे (सुरत), सुषमा देसले(दहिवद), विश्वास देवरे (नळकेस),राजू शिरसाठ (नाशिक). विज्ञानवादीशेती : राजेंद्र सोनवणे (भडगाव),देवीदास आहेर (देवळा), बारकू बेडसे (साक्री), पाणी फाउंडेशन :राजेंद्र वाढेकर (फुलंब्री). अंधश्रद्धा
निर्मूलन : प्रशांत देशमुख (कळवण),संतोष कस्तुरे (सुरगाणा), दीपक शेटे (हातकणंगले), सुरेखा सोनवणे
(पिंपळनेर), पत्रकार : प्रमोद सावंत(मालेगाव), शांताराम मगर (लोणी खुर्द), मनोहर शेवाळे (मालेगाव).
फिल्म : दीपक शिवदे (नाशिक).गायिका : प्रांजली बिरारी (नाशिक).विज्ञानवादी शिक्षक : विनायक चौगले (भुदरगड), शिवाजी वाघ (वैजापूर),विजय पाटील (मालेगाव), वपाली देवरे (मालेगाव), भरत पाटील (मालेगाव). सामाजिक कार्य : अखिल भारतीय मराठा महासंघ (दाभाडी), राज्य प्राथमिक शिक्षक संघ (मालेगाव), आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह फार्म प्रोसेसिंग, परिवर्तन महिला मंडळ
(मालेगाव). समाजप्रबोधन : भगीरथ सोनवणे. सहकार : संजय शेवाळे (मालेगाव). साहित्य : वनमाला पाटील (जालना), देवदत्त बोरसे (नामपूर), कैलास भामरे
(लासलगाव), दिलीप पाटील (धुळे), एन. आर. पाटील (चाळीसगाव),


ताज्या बातम्या