Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ग्रामीण साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी बैठक

दि . 05/03/2020


 मालेगाव : येथील आई प्रतिष्ठानतर्फे २९ मार्चला कॅम्प भागातील स्टार क्लब ग्रांऊडवर होणा-या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. स्व.जयप्रकाश पाटील साहित्य नगरी हे नाव या स्थळाला देऊन कै.वैजिनाथराव देशमुख सभामंडपात संमेलन होणार आहे.
 सकाळी आठला ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल.यात शालेय विद्यार्थी, शिक्षक, शहरातील मान्यवर, बैलगाडीतून साहित्यिक सहभागी होणार आहेत.
ग्रंथदिंडी बालगंधर्व रंगमंदिरापासुन काढण्यात यावी.ग्रंथदिंडीचा मार्ग,ग्रंथ प्रदर्शन स्टॉल नियोजन,मंडप व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले.
संमेलनाच्या नियोजनाची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी सविस्तर दिली.या बैठकीत स्वागताध्यक्ष निलिमा पाटील, शिल्पा देशमुख, विजयालक्ष्मी अहिरे,डॉ एस.के.पाटील, रमेश उचित, सुरेंद्र टिपरे, रविराज सोनार, विकास मंडळ यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी स्वागताध्यक्षा निलिमा पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा देशमुख, परिवर्तन मंडळाच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी अहिरे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष विकास मंडळ, डॉ एस.के.पाटील, मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित, गाडगेबाबा प्रतिष्ठानचे प्रकाश पानपाटील, साधना कला मंचचे प्रविण वाणी, रमेश शिंदे, सुरेंद्र टिपरे,रविराज सोनार,डॉ संदीप खैरनार,शोभा सुमराव, सुवर्णा साळुंखे, वैशाली खैरनार, दिपमाला गोसावी,सरीता पगार,बी.एम.अहिरे, अशोक फराटे, राजीव वडगे,संजय शिंदे,विवेक पाटील यांच्यास आई प्रतिष्ठानचे प्रविण शिंदे, शिवदास निकम, निवृत्ती सावंत, जितेंद्र सावंत, मधुकर शेवाळे,विश्वनाथ घोरपडे, देविदास अहिरे, साहेबराव देवरे,लता सुर्यवंशी,छाया पाटील,नुतन चौधरी, मनिषा सावळे, जयश्री कापडणीस,सविता देवरे, दत्तात्रय भामरे, भाऊसाहेब कापडणीस,निलेश नहिरे,भुषण कदम,सतीश मांडवडे, दीपक पाटील, परेश बडगुजर, मोहन शेळके, नंदू आहिरे, रवी जटिया, संदीप पठाडे, शाम ठाकरे, उमेश पवार, वैजिनाथ भारती,मदन नाथबावा, अभिजित देसले, विशाल धिवरे, दिनेश निकम आदी
पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कार्यवाह सुमित बच्छाव यांनी आभार मानले.


 संमेलन लोगो वापरावा..


ताज्या बातम्या