Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कांदा निर्यात तातडीने खुली करा या मागणीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस उतरली रस्त्यावर..

दि . 05/03/2020

 चांदवडला मुंबई-आग्रा महामार्गावर केला रस्ता रोको
ग्रामीण भागात कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांद्यावरील निर्यात बंदी 15 मार्च अवैजी आताच तातडीने उठविण्यात यावी,कांद्याला किमान 3 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा या मागण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार,राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज चांदवडला मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको केला.यावेळी संतप्त शेतकरी व कार्यकर्त्यानी रस्त्यावर कांदा फेकून जोरदार घोषणाबाजी केली.रस्ता रोकोमुळे  मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती.कांद्यावरील निर्यात अद्यापही खुली झाली नसल्याने कांद्याचे भाव रोज कोसळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे..


ताज्या बातम्या