Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सावधान! उसाचा रस पिताय का तुम्ही ?

दि . 05/03/2020

उसाचा रस प्यायला आपल्यापैकी अनेकांना आवडतो. त्यात उन्हाचा ताप आता हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे रस्त्यावरील उसाच्या गुऱ्हाळांवर लोकांची गर्दी वाढत आहे. मात्र हा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे का नाही? हे अनेकांना माहिती नाही. परंतु उसाचा रस पिताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. उसाचा रस प्यायल्याने भरपूर उर्जाही मिळते. उसाच्या रसाचे असे अनेक फायदे आहेत मात्र काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरू शकतो.
उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात कॅलरी तसेच कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे शरीराचे वजन वाढू शकते. तसेच तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर उसाचा रस पिणे शक्यतो टाळा, कारण उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते. तुमची ब्लड शुगर लेव्हल अचानकपणे वाढत असेल तर उसाच्या रसाचे सेवन करू नये. यामुळे ब्लड इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. उसाचा रस प्यायल्याने कफाचा त्रास वाढतो.
अनेकदा आपण उसाचा रस फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु यामुळे फुड पॉइझनिंगचा धोका असतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उसाचा रस जिथे पिता, तिथली स्वच्छता पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे रसासाठी जे पाणी वापरलं जातंय, ते निर्जंतुक आहे का हे पाहणे महत्वाचे आहे. उसाच्या रसात टाकला जाणारा बर्फ स्वच्छ नसतो. त्यामुळे रस पिताना बर्फ कुठून येतो याचीही पडताळनी केली पाहिजे.


ताज्या बातम्या