Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नवी मुंबईत वाशी उड्डाणपुलावर डंपर अपघात

दि . 05/03/2020

नवी मुंबईतील वाशी उड्डाणपुलावर डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसंच पिवळ्या रांगेबाहेर वाहनांची गर्दी झाली असूनही टोल वसुली मात्र सुरू असल्याचं समोर आलं आहे. हा अपघात मुंबईला येणाऱ्या लेनवर झाला होता. त्यामुळे तीन मार्गिकांपैकी एक मार्गिका सुरू होती. मात्र आता तीन मार्गिका सुरू केल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे.

सध्या अपघात झालेल्या डंपरला वाशी उड्डाणपुलावरून मानखुर्द दिशेने खाली नेण्यात आलं आहे. डंपरचा अपघात झाल्यानंतर दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. वाशी गावापर्यंत लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्या होत्या. मात्र तरी देखील टोल वसुली बंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे वाशी टोल नाक्याने पिवळ्या पट्टीच्या नियमांना ढाब्यावर बसवल्याचे समोर येत आहे. पिवळ्या रांगेमागे दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यानंतर टोल वसुली करू नये, असा महाराष्ट्र शासनाने आदेश दिला होता. मात्र त्या आदेशाचे पालन वाशी टोल नाक्याने केलं नसल्याचं दिसून आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही वाहतूक कोंडी टोल वसुलीमुळे झाली नसून अपघातामुळे झाली. त्यामुळे टोल बंद करण्याचा प्रश्न येत नाही.


ताज्या बातम्या