Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




मोबाईलवरुन पालक रागावले २० वर्षीय तरुणाची आत्महत्या

दि . 05/03/2020

पुणे । मोबाइल मध्ये नेहमी मग्न असल्याने घरचे रागावले म्हणून २० वर्षीय तरुणान गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील काशिमबेग गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची मंचर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हृतिक सुरेश मानकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मंचर येथील महाविद्यालयात तो शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हृतिकचे वडील हे मुंबईत नोकरी करतात. साप्ताहिक सुट्टीला ते घरी येतात. हतिकचा अधिकाधिक वेळ हा मोबाइलवर जातो. त्यामुळे
रविवारी त्याला पालक रागावले. यामुळं तो रागानं घरातून निघून गेला. बराच वेळ झाला तरी मुलगा परत आला नाही म्हणून त्यांनी त्याच्या केला. पण त्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं पालकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जवळच असलेल्या शेडमध्ये छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसला. त्यांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेल.तेथे वैद्यकीय तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे मानकर कुटुंबीयांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.


ताज्या बातम्या