Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनपा प्राथमिक शाळेत आयुक्तांसह पथकाची तपासणी,१८ शिक्षक गैरहजर

दि . 05/03/2020

मालेगाव । महापालिका शिक्षण मंडळाच्या ८८ प्राथमिक शाळा आहेत. यातील दोन मराठी शाळा वगळता सर्व उर्दू शाळा आहेत. महापालिका आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या पथकाने मंगळवारी अचानक शाळांची तपासणी केली असता, शाळेला शिक्षकांनीच दांडी मारल्याचे आढळून आले काही शाळांमध्ये मूळ नेमणूक असलेल्या शिक्षकांऐवजी प्रतिनियुक्तीवरील शिक्षक आढळून आले. पाच शाळांची तपासणी केली असता, एकूण २४ शिक्षकांपैकी १८ शिक्षक गैरहजर आढळून आले. ही परिस्थिती पाहता शहरातील विद्यार्थ्यांचे भविष्य वाऱ्यावर आहे.
गैरहजर शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश  बोर्डे यांनी शिक्षण मंडळाचे आस्थापना विभागप्रमुख किरण सेंगर यांना दिले आहेत. शिक्षकांनी कारणे दाखवा नोटीसीला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.आयुक्त बोर्डे,  उपायुक्त कापडणीस, लेखाधिकारी कमरुद्दीन शेख, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहाय्यक आयुक्त सागर आहेर, वैभव लोंढे,प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे आदींच्या पथकाने मंगळवारी सकाळी अचानक मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १५, २५, ६७, ६९ व ८८ या पाच शाळांना भेटी देत तपासणी केली. शाळा क्रमांक ६७ वरील नेमणूकीस असले ले चार, तर शाळा क्रमांक १५ मधील पाच शिक्षक गैरहजर आढळून आले. प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांच्या भरोश्यावर शाळेचे कामकाज व अध्यापन सुरु होते.शाळा क्रमांक ८८ मध्ये सहापैकी दोन, ६९ मध्ये तीनपैकी दोन, तर शाळा क्रमांक २५ मध्ये सहापैकी पाच शिक्षक गैरहजर आढळून आले. आयुक्तांनी या पा चही मागवून घेत त्याची तपासणी केली. यानंतर  शाळांचे हजेरीपत्रकसेंगर यांना गैरहजर असलेल्या शिक्षकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या प्रकारामुळे आयुक्तांसह अधिकारीही अचंबित झाले. शाळा क्रमांक ६७ मध्ये अकीला याकूब खान यांच्यासह दोन प्रतिनियुक्ती वरील (डमी) शिक्षिका आढळून आल्या.त्या इयत्ता तिसरी व सातवीच्या वर्गात शिकवत होत्या. पालकांसह विद्यार्थ्यांना या सर्व बाबी ज्ञात आहेत.मनपा शिक्षण मंडळाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत १७ हजार ९५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


ताज्या बातम्या