Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




राज्यात लवकरच १०० युनिट वीज मोफत

दि . 05/03/2020

मुंबई । राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्या साठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार, याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल. घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी एक समिती अभ्यास करून, समितीचा अहवाल तीन महिन्यांत प्राप्त झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
देशात सर्वात जास्त महाग वीज आपल्या राज्यात असली तरी त्याची वेगवेगळी कारणे आहेत. वीज दरवाढीबाबत दर चार वर्षाच्या नियंत्रण कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज निर्मिती खर्च, ट्रान्समिशन खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. हा तपशील व महसुली तूट लक्षात घेऊन एमईआरसी वीजदर निशित करते. वीजनिर्मिती स्रोतांमधील भिन्नता, त्यामुळे बदलणारी वीज खरेदी किंमत, ग्राहक वर्गवारी, ग्राहकांच्या वीज वापरांचे वैविध्य, तुल नेने मोठे भौगोलिक क्षेत्र, कोळशासारखा कच्चा माल इतर राज्यांतून आणणे आदी मुळे महाराष्ट्रात वीज दर जास्त आहे त. असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर राज्यात घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेणार आहे.शेतकऱ्यांना दिवसा वीज उप लब्ध करून देण्याबाबत धोरण आखण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.औद्योगिक वापरासाठी एमएसईबीचे वीजेचे दर १८ ते २० रूपये प्रति युनिट इतके आहेत. टाटा पॉवरसारखी खासगी कंपनी दोन ते तीन रूपये प्रति युनिट वीज उप लब्ध करून देते. निर्मिती आणि ट्रान्समिशन याच्या खर्चात मोठी तफावत आहे. केवळ भ्रष्टाचारामुळे वीज निर्मितीचा खर्च वाढतो आहे. राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी एमआयडीसी खासगी कंपनीकडून वीज घेण्याचा विचार करत आहे.
सामान्यांना वीज रास्त दरात देण्याचा आमचा प्रयत्न आहे.तीन महिन्याच्या कालावधीत वीज मोफत देण्याबाबत एक समिती अहवाल सादर करेल.
अशा परिस्थितीत एमएसईबी काय करणार, असा सवाल काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला. यावर सरकार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संचलन आणि सुव्यवस्थेतील खर्च मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले.


ताज्या बातम्या