Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी १९ ते २२ मार्च दरम्यान क्रेडाई वास्तू एक्स्पो २०२० चे आयोजन

दि . 04/03/2020

मालेगाव ( प्रतिनिधी ) :- भारतातील सर्व नोंदणीकृत रिअल इस्टेट बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था क्रेडाईच्या मालेगाव शाखेतर्फे सटाणा रस्त्यावरील यशश्री कंम्पाउंड येथे दि.१९ ते २२ मार्च दरम्यान क्रेडाई वास्तू एक्स्पो २०२० चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष विजय पोफळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुमारे १० लाख लोकसंख्या असलेले मालेगाव शहर हे या क्षेत्रातील सर्वांत वेगाने वाढणारे शहर असून परिसरातील सटाणा, नामपूर, नांदगाव, ताहाराबाद, उमराणे आदी गावातील नागरीकांच्या दृष्टीने खरेदी- विक्रीसाठी मालेगाव हे एकमेव बाजारपेठ आहे. या ग्राहकांचा विचार करूनच दि.१९ ते २२ मार्च दरम्यान एक्स्पो २०२० चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात ९३ स्टॉल असणार आहे. यासाठी दोन स्पॉन्सर व १७ असोसिएट स्पॉन्सर लाभले आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध रियल इस्टेट ब्रॉण्ड्स, कॉर्पोरेट बिल्डर्स, बिल्डिंग मटेरियल, वितरक व व्यापारी आपले काम व त्यातील वैशिष्ट्ये सर्वांसमोर घेऊन येणार आहेत. तसेच नवीन स्टार्ट-अप उद्योगांना देखील हे प्रदर्शन सर्वोत्तम माध्यम आहे. ह्या प्रदर्शनास सुमारे २० ते २५ हजार लोक भेट देतील असा अंदाज आहे. या प्रदर्शनाचा नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन क्रेडाई संयोजकांनी केले आहे. यावेळी सचिव दिनेश जैन, प्रोजेक्ट चेअरमन रवींद्र शेलार, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र भंडारी, दीपक मोदी, सुनील छाजेड, भागीरथ असदेव, मधुसूदन काबरा, अजय बच्छाव, आशिष छाजेड, सर्जेराव पवार, सचिन शाह आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या