Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी जाहीर सभा

दि . 04/03/2020

पोलिसांनी परवानगी नाकारल्यास काँग्रेस कॅमिटी कार्यालयातून मार्गदर्शन : आसिफ शेख

मालेगाव ( प्रतिनिधी ) :- माजी आमदार शेख रशीद यांच्या परिवाराला राजकारणात बदनाम करण्याचे षडयंत्र रचून शहरात दहशत पसरवली जात आहे. शहरातील सत्य जाणीव नागरीकांना व्हावी, यासाठी दि.८ मार्च रोजी मालेगाव शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे जाहिर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेसाठी पोलीसांकडे परवानगी मागितली असून पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जर पोलीसांनी परवानगी दिली नाही तर किदवाई रस्त्यावरील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल अशी माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली.

येथील उर्दू मिडिया सेंटर येथे काल बुधवार दि.४ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इंग्रजांनी जसे फोडाफोडीची निती वापरुन राजकारण केले. त्याचप्रमाणे शहराचे आमदार दुसऱ्याना लढवून राजकारण करीत आहेत. विधानसभा निवडणूकीनंतर माजी आमदार रशिद शेख यांच्या परिवाराला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देवून माजी आमदार शेख म्हणाले, शहरात कोणाची दहशत आहे. शहर शांततेला कोण गालबोट लावत आहे. कोणाच्या पक्षात किती गुंड आहेत हे नागरीकांना कळावे यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली जाहिर सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी रितसर पोलीसांकडे परवानगी मागितली. जे दोन्ही समाजाला बरोबर घेवून चालतात त्यांना पोलीस प्रशासन परवानगी नाकारते. ती कोणत्या कारणाने नाकारली त्याची माहिती द्यावी. अजून ही सभेसाठी तीन-चार दिवसाचा कालावधी बाकी आहे. पोलीस प्रशासनाने सभेस परवानगी द्यावी. परवानगी न दिल्यास किदवाई रस्त्यावरील कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयातून नागरिकांना संबोधीत केले जाईल असा इशाराही माजी आमदार आसिफ शेख यांनी दिला. यावेळी नगरसेवक अस्लम अंन्सारी, शेख जानी बेग, नूर भाई आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या