Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी ८ मार्चला एव्हथॉन स्पर्धा

दि . 04/03/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मालेगावी ८ मार्च रोजी होणाऱ्या एव्हथॉन महिला धावण्याच्या स्पर्धेच्या तयारीस
आयोजकांनी रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट यांनी वेग दिला असून नासिक जिल्हा पोलिस दलाने सदरच्या महिला सक्षमीकरनास सक्रिय पाठींबा जाहीर करून या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

सदरचा उपक्रम सुरवातीस फक्त महिला व युवतींसाठीच महिला सबलिकरन, एकता व प्रगती यासाठी ठेवण्यात आली होती मात्र मालेगावातील युवक वर्गाचा आग्रह व विनंती लक्षात घेऊन नासिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या सांगण्यावरून या मॅरेथॉन मध्ये युवकांचा देखील समावेश करून घेण्याचे संयोजकांनी ठरवले आहे. युवकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख शिल्पा देशमुख, कविता कासलीवाल, विजयलक्षमी अहिरे, किशोर कुटमुटीया ,डॉ.समर्थ बोराडे यांनी केले आहे.
महिला व युवतींचा धावण्याचा मार्ग वेळ स्वतंत्र
राहणार असून युवकांचा मार्ग शहरातील असून महिला व युवतींसाठी मालेगाव कॅम्प परिसरातील स्वतंत्र मार्ग ठेवला आहे असे स्पर्धा संचालक ऍड. शिशिर हिरे, अमित खरे, सर्जेराव पवार, निलेश पाटील, देवा पाटील, अरुण पठाडे, दिलीप ठाकरे यांनी सांगितले आहे. १५ वर्षा खालील सहभागी साठी पूर्व नोंदनीची आवश्यकता नाही मात्र ज्यांना स्पर्धा पूर्ण पदक व आकर्षक स्पर्धा टि शर्ट पाहिजे आहे त्यानी स्पर्धा शुल्क भरून नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. स्पर्धेत अनेक नामवंत सामील होणार असून महाराष्ट्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णाप्रकाश,  पोलिस अधीक्षक आरती सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप घुगे यात  सामील होणार आहेत. धावण्याचे दोन्ही मार्ग निश्चित झाले असून स्पर्धेच्या ठिकाणी झूबा, पारंपरिक डान्स, स्पीड योगा होणार असून व्यासपीठ उभारणीचे काम सुरू झाले आहे. धावण्याच्या मार्गा वर पाणी व एनर्जी ड्रिंक देण्यात येणार आहे.


ताज्या बातम्या