Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मित्राबरोबर बोलत उभी होती.. क्षणात इमारतीवरुन उडी मारुन केली आत्महत्या

दि . 04/03/2020

नागपूरमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील मानकापूर पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन या तरुणीने आत्महत्या केली. अंकिता माकोडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव असून ती चांगल्या पदावर कामाला होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता ही शहरातील राज पॅलेस येथील बीझ प्रोस्पेक्टस या कंपनीमध्ये काम करायची. काल दुपारी अंतिकाने ज्या इमातरीवरुन उडी मारली त्या इमारतीखाली ती तिच्या मित्राबरोबर बराच वेळ गप्पा मारत उभी असल्याचे अनेकांनी पोलिसांना सांगितलं. या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अंकिता तिथून निघून गेल्याचेही अनेकांनी पाहिले.
आपल्या मित्राबरोबर वाद झाल्यानंतर रागाच्याभरात अंकिता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारत तिने आत्महत्या केली. नक्की अंकिता आणि तिच्या मित्रामध्ये काय बोलणे झाले?, दोघांमध्ये वाद नक्की कशामुळे झाला ज्यानंतर अंकिताने थेट आत्महत्या करण्याचा टोकाचे पाऊल उचलले अशा अनेक प्रश्नांचा उत्तरे अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात पोलीस सध्या तपास करत असून अंकिताच्या मित्राची चौकशी केली जाणार असल्याचे समजते. सध्या या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे.


ताज्या बातम्या