Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नामपूरला रयत क्रांती संघटना व कांदा उत्पादकांचा रास्ता रोखो

दि . 04/03/2020

नामपूर:- गत दोन दिवसांपासून कांद्याचे दर अचानक कमी झाल्यामुळे केंद्र शासनाच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र प्रमुख  दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोखो करून आज दुपारी 12 वाजता  निवेदन देण्यात आलेे.
मोसम खोऱ्यात यंदा उन्हाळ कांद्याची प्रचंड लागवड आहे .वातावरण चांगले असल्यामुळे उत्पादन सुद्धा चांगले निघत असून,आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी शेतातून काढलेला कांदा तात्काळ विक्री करीत आहे.मात्र दोन दिवसांपासून कांद्याचा दर एक हजार ते पंधरासे पर्यंत खाली आल्यामुळे कांडा उत्पादक चांगलाच संकटात सापडला याबाबत शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने नामपूरला संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोखो करण्यात आला.मात्र आंदोलनाची दखल घेऊन पोलीस अधिकारी सप्नील कोळी नायब तहसीलदार एस के नेरकर ,मंडळ अधिकारी सी.पी अहिरे,आर बी भामरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आंदोलन कर्त्याना समज घालून  काही वेळातच रास्ता रोखो मागे घेण्यात आले.
तहसील कार्यालयातून  सदर निवेदन  इमेल द्वारे मंत्रालयात पाठवण्यात आले असून,कांदा निर्यात कायम शून्य टक्यावर ठेवावी,कांद्याला आधारभूत भाव मिळाला पाहिजे.शासनाने हमी भावाने कांदा खरेदी करावा.मक्याला 1740 रुपयांचा हमी भाव मिळाला पाहिजे.मार्च अखेर पर्यंत खरीप हंगामातील पीक विमा रक्कम सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी,शेतीला स्वामी नाथन आयोग लागू झाला पाहिजे किसान सन्मान योजनेचे वार्षिक सहा हजार रक्कम वाढवुन 12 हजार रु करावी या मागण्याचे निवेदन रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाजार समितीचे  संचालक दीपक पगार यांच्या वतीने  शासनाला देण्यात आले.
या प्रसंगी बाजार समिती संचालक शरद सावंत,भाऊसाहेब कांदळकर .शशिकांत कोर,प्रवीण अंबासनकर,पंढरीनाथ अहिरे  राजाराम पाटील,डोंगर पगार,शांताराम निकम,तुषार काकडे. प्रवीण सावंत .समीर सावंत,संतोष पगार,भाऊसाहेब पगार,नानु पवार,सह संघटनेचे कार्यकर्ते व कांदा उत्पादक हजर होते.
  केंद्रात भाजपची तर राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे.कसमा पट्टा कांद्याचे आगार असून  या  बाबत  कृषिमंत्री दादाजी भुसे,खासदार डॉ. सुभाष भामरे,आमदार दिलीप बोरसे,यांचे  सहकार्य शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.नामपूरच्या आंदोलनात केवळ रयत क्रांती व शेतकरी बांधव यांनी सहभाग घेतला  स्थानिक सत्ताधारी नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत होती.


ताज्या बातम्या