Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव - मुलगी बघायला आले अन् लग्न करुनच गेले ह्या परिवाराचा आदर्श विवाहाचा स्तुत्य निर्णय....

दि . 04/03/2020

मालेगाव - आजच्या काळात लग्नसमारंभात वाढ खर्च करन लाखोंची उधळपट्टी होत असतांना येथील मारवाडी समाजातील दोन परिवारांनी खर्चिक परंपरा व हुंडापद्धतीला फाटा देवून आदर्श विवाह घडवून समाजात स्तुत्व पायंडा निर्माण केला.
मालेगावम येथील रहिवासी संजय सुगनलालजी टाक मेनरोड मारवाडी गल्ली यांची ज्येष्ठ कन्या कु. तेजस्विनी ही बी.कॉम पदविधारक आहे व मुळचे बेलापुरचे व हल्ली आळंदी येथे वास्तव्यास असणारे व्यापारी संतोष बंसीलाल चावल यांचे सुपुत्र चि.गणेश हा इलेक्ट्रॉनिक इंजीनीयर असून पुण्यात सर्विस करतो.
1 मार्च मालेगाव मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात दोघांना स्थळ पसंत पडल्यानंतर दोन्ही परिवारातील लोकांनी लग्नसमारंभ व हुंडा पद्धतीला फाटा देऊन वैदीक पद्धतीने तातडीने साखरपुडा करून मालेगावी बालाजी मंदिरात एक नवीन आदर्श निर्माण केला. या सर्व घडामोडीत पिंपळगाव बसवंतचे प्रसिद्ध व्यापारी व समाजसेवक जीवनशेठ टोकशा, मुलाचे वडील संतोषजी चाकण, शिरपूर पत्रकार संघाचे अपक्ष राजेश मारवाडी, मुलीचे वडील संजय टाक, बुलढाण्याचे सरकारी वकिल अनिल वर्मा, दिगंबर जैन समाजाचे कार्यकर्ता समाजसेवक संतोष लोंहाडे, मनिष पांडे. हे सर्व यावेळी उपस्थित होते.या निर्णयाने मालेगाव शहर व समाजातून कौतुक होत आहे. नवीन सामाजिक सुधारणेचा दृष्टीने मारवाडी समाजात पडलेले हे एक वाखाणन्याजोगे पाऊल आहे.


ताज्या बातम्या