Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव - आर्थिक वादातून नातवांकडून आजीचा गळा दाबून खून ....

दि . 04/03/2020

दि:२६ फेब्रुवारी रोजी निंबायती येथील कमलाबाई जयराम जगताप (६०) या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात प्रारंभी अनोळखी मारेक-यांविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल चौकशी केली असता कमलाबाईची हत्या अर्थिक कारणावरून झाल्याचे समोर आले. तिचा नातू आकाश सुभाष जगताप (२५) रा. उद्योग भवन सिन्नर, आकाश बाळासाहेब शिरसाठ (२१) रा. शिवाजी नगर सिन्नर अजय शिवाजी ताकतोडे (१८) रा. सिन्नर यांनी केली असल्याचे स्पष्ट झाले. ते तिची हत्या करण्यासाठी सिन्नर येथन मोटारसायकलने निंबायतीला आले होते. आकाश जगताप याला कसारा भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहा. निरीक्षक वाघ, जमादार प्रभाकर पवार, चव्हाणके, घुले,लोखंडे, निलेश कातकडे, किरण काकड,संदिप लगड, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक भदाणे हे तपास करीत आहेत.


ताज्या बातम्या