Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुंबईची भाषा हिंदी म्हणणाऱ्या तारक मेहता चा माफीनामा

दि . 03/03/2020

या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार अशी शपथ घेतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापूजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. हे मनोमिलन घडवून आणताना या मालिकेतील वृद्ध बापूजी अर्थात जेठालालचे वडील जयंतीलाल गाडा यांच्या तोंडी मुंबईची भाषा ही हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.
  मुंबईची भाषा हिंदी  आहे असं म्हटल्यामुळं सब टिव्हीवरची मालिका तारक मेहता का उलटा चष्मा चांगलीच वादात सापडली आहे. अखेर या मालिकेच्या निर्मात्याने आणि बापूजीची भूमिका साकारणाऱ्या अमित भट यांनी माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात या मालिकेतील जेठालालचे वडील बापूजी यांच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आला आहे. याबाबत मनसेने आवाज उठवल्यानंतर आता मालिकेच्या निर्मात्यांनी व्हिडीओ प्रसारित करत माफी मागितली आहे. या मालिकेत  तारक मेहता ची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांच्याकरवी व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने सर्वांना सामावून घेतलं आहे. या अर्थाने मुंबईची भाषा हिंदी हे वाक्य वापरण्यात आलं होतं. आम्ही प्रत्येक प्रांताचा-धर्माचा आणि भाषेचा सन्मान करतो. पण मालिकेत प्रसारित झालेल्या संवादामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आम्ही माफी मागतो, या शब्दांत निर्मात्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याआधी या मालिकेत बापूजीची भूमिता साकारणारे कलाकार अमित भट यांनीही याप्रकरणात माफी मागितली. अमित भट यांनी मनसेच्या नावाने मराठीमध्ये पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली. मला स्क्रिप्टमध्ये लिहून देण्यात आलेला संवाद मी कॅमेऱ्यासमोर बोललो. मुंबईची भाषा ही हिंदी नसून मराठी आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दांत अमित भट यांनी माफी मागितली.


ताज्या बातम्या