Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कांचने गावात वाघांचा मुक्त संचार ; नगरिकांमध्ये घबराट

दि . 03/03/2020

देवळा:- तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कांचने गावात (कांचनेबारी) रविवारी रात्री दोन वाघ आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.वन विभागाने याची दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा बसवावा अशी मागणी कांचनेसह,कणकापूर,शेरी,खर्डे येथील नागरिकांनी केली आहे.याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून या वाघांचा मुक्त संचार वाढला असून,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कांचनेबारी मार्गावरून वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.या मार्गावरून रात्री अपरात्री जा ये करणाऱ्या वाहनधारकांना वाघ आढळून आल्याची चर्चा आहे.या भीती पोटी रात्री या मार्गावरून जाण्याचे वाहनधारक धाडस करत नाही.या भीतीपोटी कांचने व परिसरात दिवसा वीजपुरवठा राहत नसल्याने येथील व आजूबाजूचे शेतकरी रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी देखील जात नसल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे.तरी वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा बसून,नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी कांचने व परिसरातील नागरिकांनी केली आहे.


ताज्या बातम्या