Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कॅम्प-रावळगांव नाका भागातील विविध विकास कामांबाबत मनपा आयुक्तांना निवेदन

दि . 03/03/2020

मालेगाव : येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे आयुक्त किशोर बोर्डे यांना विविध विकास कामां बाबत निवेदन देण्यात आले.

रावळगांव नाका येथे वाह तुक बेट निर्माण करणे व चौक सुशोभिकरन, रावळगांव नाका ते कॅम्प पोलीस स्टेशन पर्यंत २०० मीटर रोडाचे डांबरीकरण, डॉ .वाव्हळ हॉस्पीटल ते शाहु नगर रोडाचे डांबरीकरण, भगतसिंग नगर सुयोग मंगल कार्यालय ते चर्चगेट रोडाचे डांबरीकरण, स्वातंत्र सैनिक नगर येथील रस्ते निर्मिती, नामपूर रोड ते अंजोदयाबाबा मंदिर प्रोफेसर कॉटर ते हिंमत नगर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे इत्यादी मागणी बाबत निवेदन देण्यात आले.

मालेगाव शहरातील कॅम्प भागाचा केंद्रबिंद म्हणून रावळगांव नाका हा भाग ओळखला जातो. नामपुर मार्ग गुजरात राज्याशी जोडणारा भाग, भायगांव रोड , हिंमतनगर मार्गे कुसंबारोड याव्दारे ४० च्यावर खेड्यांचे याठिकाणी केंद्राकरण होते. त्याचबरोबर सराव पाठशाळा, डी. एड. कॉलेज, मराठी शाळा, बी. एड. कॉलेज, कृषी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज, जाजु इंग्लिश मेडियम स्कूल,भायगाव नव वसाहत भागात राहणाऱ्या रहिवाश्यांचा तसेच हिंमतनगर, वैतागवाडी, सह ग्रामीण भागातील रहिवाश्यांना तसेच कुसुंबारोड मार्गे येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांची मोठी सोय होईल. तसेच हिंमत्तनगर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग होईल. इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी निखिल पावर, देवा पाटील, प्रा जगदीश खैरणार, रमेश उचित, प्रवीण चौधरी, सुशांत कुलकर्णी, अतुल लोढा, दीपक पाटील, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, कपिल डांगचे, कलीम युसूफ अब्दुल्ला, रजनीकांत साळुंखे साळुंखे, राईस शेख आदिंच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले. 


ताज्या बातम्या