Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शहरातील ७० टक्के यंत्रमाग कारखाने उद्यापासून बंद

दि . 03/03/2020

मालेगाव :  मंदीमळे कापड उत्पादनाचा उठाव कमी झाला आहे. त्यातच होळी सण आल्याने गुजरात व राजस्थानच्या बाजारपेठा बंद राहतात. त्यामुळे ४ मार्चपासून शहरातील ७० टक्के स्वयंचलित यंत्रमाग कारखाने बंद राहतील, अशी माहिती मालेगाव सायजिंग असोसिएशनचे अध्यक्ष युसूफ इलियास यांनी दिली.

कारखाने ५ ते १० = मार्चदरम्यान कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत एकमत न झाल्याने बंद

दर्शविल्याने पाच दिवस पूर्णः बंदवर एकमत होऊ
शकले नाही. सध्या कोरोना आजाराने चायना पाठविला जाणारा कापूस भारतात पडून आहे. कापसाच्या दरात घट झाली आहे.

४२०० रुपये प्रति क्विंटलचा कापूस १९०० रुपयांनी विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी सुताचे दर सात रुपयांनी वाढले होते. १७४ रुपये किलोचे सत १८१ रुपये झाले होते. मात्र, कापड खरेदी थांबल्याने सूताचे दर पूर्ववत झाले आहेत.

मागील बुधवारी मजुरांचे पगार करून काही कारखानदारांनी कारखाने बंद केले. येत्या बुधवारी पगार वाटप झाल्यानंतर काही कारखाने बंद केले जातील.

१० मार्चपर्यंत कारखाने बंद राहण्याची शक्यता आहे.


ताज्या बातम्या