Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वणी शहरातील अवैध जुगार अड्डयावर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचा छापा

दि . 03/03/2020

वणी - नाशिक जिल्हयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह मॅडम यांचे आदेशान्वये विशेष पथकाची धडक कारवाई सुरू आहे. काल दिनांक ०२/०३/२०२० रोजी ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वणी पो. स्टे. हद्दीतील जुना बस स्थानक परिसर येथे टाईम डे नावाच्या मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन ११,३६०/- रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला आहे. दिनांक ०२/०३/२०२० रोजी विशेष पोलीस पथकातील अधीकारी व कर्मचारी हे वणी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयांवर कारवाई करीता गस्त घालत होते, दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पि. डब्ल्यु.डी. ऑफीस समोर, जुने बस स्थानक जवळ, पान टपरीचे पाठीमागे असलेल्या मोकळया जागी छापा टाकला असता इसम नामे १) मुनीर कादीर मन्यार ऊर्फ मुन्ना, वय ४१, रा. पंचारगल्ली, वणी २) दिपक अशोक चारोस्कर, वय ४२ वर्षे, रा. कोळवाडा, वणी ३) मोहन पोपट पवार, वय ४५ वर्षे, रा. दत्त नगर , वणी ४) रविंद्र ईश्वर आव्हाड, वय ३१ वर्षे, रा. कोळवाडा, वणी हे टाईम डे नावाचा जुगार खेळताना मिळुन आले. सदर ठिकाणी पोलीसांची चाहुल लागताच काही जुगारी तेथुन पसार झाले. ताब्यात घेतलेल्या इसमांचे कब्जातुन रोख रक्कम रू. १०,३६०/- व जुगाराचे साहित्य असा एकुण कि. रू. ११,३६०/ मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांविरुध्द वणी पोलीस ठाणे येथे मुंबई जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील पोउपनि कल्पेश दाभाडे व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी सदर अवैध धंदयावर कारवाई केली आहे. जिल्हयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन होणेसाठी आगामी काळातही सतत कारवाई सुरू राहणार आहे.


ताज्या बातम्या