Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन

दि . 03/03/2020

दि.३/३/२०२०
देवळा प्रतिनिधी राकेश आहेर आज रिपाई A नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश अहिरे यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले त्यात देवळा तालुक्यातील अवैद्य धंदे कळवण रोड येथील जे मद्य  विक्रीचे दुकान सुरु आहे ते वैध्य आहे की अवैध्य याची त्वरित चौकशी करून कारवाई करण्यात यावी व तहसील कार्यालयात अनेक प्रकारची कामे पूर्ण होत नाहीत, एका कामासाठी येथे अनेक दिवस नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात तसेच रेशन कार्ड नवीन जुने दुरुस्ती करणे व  घेतलेल्या रेशन ची पावती रेशन दुकानदाराकडून मिळणेबाबत,रेशन दुकानदार मनमानी कारभार करतात यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. निराधार महिला यांच्या पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुण संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले 15 दिवसात सदर मागण्या मान्य न झाल्यास या पेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाई (A)चे नाशिक  ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश अहिरे यांच्यामार्फत तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ साहेब व देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख साहेबांना सदर निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश आहिरे पुंजाराम पवार उपाध्यक्ष जिल्हा युवा महासचिव, प्रकाश गरूड संघटक,   तालुकाध्यक्ष आकाश गरूड, पवन गरूड ,समाधान गरूड, युवा कार्याध्यक्ष समाधान केदारे, श्रीकांत केदारे, अप्पा केदारे, योगेश आहिरे, युवराज पवार, शहर अध्यक्ष रमेश पवार, युवा देवळा शहर अध्यक्ष बॉबी पवार, आदि कार्यकर्ते उपस्थित होते


ताज्या बातम्या