Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी पाच संशयीतांची नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

दि . 03/03/2020

डांगसौंदाणे:- अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी पाचही संशयितांंचे जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने 14 दिवसाची म्हणजेच 11 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी देत सर्वांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. यात दि.23 फेब्रुवारी रोजी बागलाण तालुक्‍यातील  ततानी राखीव वन कक्षातील कक्ष क्रमांक 229 मधील डावखल (क्षेत्र 615 हेक्टर)  येथील वनविभागाच्या शासकीय जंगलात सागवानाची अवैध वृक्षतोड प्रकरणी वनविभागाने मोटरसायकल   क्रमांकGJ21AL 7258 सह सुमारे साठ वर्ष वयाचे सागवान बुड, करवत ,दोन मोबाईल सर्व मिळून 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करत  तालुक्‍यातील संजय हिरामण देशमुख रा. भावनगर, कैलास शांताराम जोपळे रा .महारदर ,नारायण गंगाराम साबळे रा. महारदर , यांच्या व्यतिरिक्त गुजरात राज्यातील गिरीश मार्‍या चौरे रा. नकट्याहनुमंत ता .अहवा जिल्हा डांग  अशा चार संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले होते.
त्यांच्यावर दि.24/2/ 2020  रोजी भारतीय वन अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन सर्वांना सटाणा न्यायालयात हजर केलेअसताचौघांना तीन दिवसांची म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी दिली होती .तर पाचवा संशयित रामू नामदेव जोपळे यास साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी दि. 25 फेब्रुवारी रोजी महारदर येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाच्या वन कोठडीचे आदेश न्यायमूर्ती व्ही ए आव्हाड  यांनी दिले  होते .वन कोठडी संपून पाचही संशयितांना दि. 26 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता सर्वांची सदर गुन्ह्यात सक्रियता दिसून आल्याने न्यायमूर्ती आव्हाड यांनी पाचही संशयितांचे जामीन अर्ज फेटाळून लावत 14 दिवसाची म्हणजेच  दि.11 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी  देेेत त्या सर्वांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
याकामी ततानीचे प्रभारी वनक्षेत्रपाल एच वाय अहिरे ,वनरक्षक एन. एम. मोरे, वनरक्षक पी. आर. पाटील, वनरक्षक के. व्ही. मोहिते, एन के बोडके,एजाज शेख, वनमजूर गंगाधर नवरे, कृष्णा काकुळते यांनी शोध मोहिमेत सहभाग नोंदवला.पुढील तपास उपविभागीय वनाधिकारीजे. एन .ऐडलावर यांचे मार्गदर्शनात सटाणा वनपरिक्षेत्राधिकारी (प्रा. )रमेश साठे  करीत आहेत.


ताज्या बातम्या