Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातील चौघे अपघातात ठार,१२ प्रवासी गंभीर....

दि . 03/03/2020

सुरत-धुळे महामार्गावर सोनगडनजीक झालेल्या भीषण अपघातात सोमवारी (दि. २) मालेगाव तालुक्यातील चार जण ठार झाले, तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये गुगुळवाड येथील तीन, तर वनपट येथील एकाचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी सुरत येथून दशक्रिया विधी आटोपून परतत असताना ही घटना घडली.
गुगुळवाड येथील १६ प्रवासी क्रुझरमधून (एमएच ४१/एएस ५३०९) परत येत असताना समोरून येणारा ट्रक व बाजूला धावत असलेली बस (जीजे १८/झेड ६४६८) या तीन वाहनांमध्ये सोमवारी दुपारी चार वाजता हा अपघात झाला. क्रुझरमधील गुगुळवाड येथील समाधान शिंदे (रा. वनपट), परबत निकम, अशोक आत्माराम निकम, विश्वास रतन निकम (सर्व रा. गुगुळवाड) हे चारही जागीच ठार झाले. क्रुझरमधील अन्य १२ प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सोनगड, बारडोली येथील रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती गुगुळवाड येथील ग्रामस्थ व नातेवाईक आर. डी. निकम यांनी दिली. या घटनेनंतर गुगुळवाड गावात शोककळा पसरली असून, निकम यांच्यासह कुटुंबीय सायंकाळी उशिरा सोनगडकडे रवाना झाले होते.


ताज्या बातम्या