Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
संघटना बळकटीसाठी सर्वांनी प्रत्नशिल रहावे-यशवंत पवार

दि . 03/03/2020

पत्रकार संघाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी आवटे यांची नियुक्ती
मालेगाव (प्रतिनिधी )
मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संघटनात्मक बळकटीसाठी पदाधिकारींनी प्रयत्न करावे असे आवाहन  पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार यांनी केले.
न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक श्री पवार यांचे अध्यक्षतेखाली  मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.दरम्यान,याबैठकीत प्रभारी जिल्हाध्यक्षपदी गावकरीचे कल्याणराव आवटे यांच्यासह रिक्त पदांवर नविन पदाधिकारींची नियुक्ती करण्यात आली.

या बैठकित पत्रकारांच्या अडी अडचणी सोडवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे निरसन व मार्गदर्शन  करतांना संघटन वाढीसाठी आपापसातील मतभेद बाजूला सारुन सर्वांनी प्रयत्न करण्याबरोबरच शासनस्तरावरील प्रवंबित मागण्यांसाठी पत्रकारांनी एकजुटीने जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.यापुढे दरमहिन्याची बैठक प्रत्येक तालुक्यातील मुख्यालयी घेण्यात येणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.
यावेळी संघाच्या बैठकांना व कार्यक्रमांना सातत्याने अनुपस्थित असलेल्या पदाधिकारींना पदमुक्त करुन त्यांचे जागी नविन पदाधिकारी नियुक्त करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.त्यानंतर रिक्त पदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यात प्रभारी जिल्हाध्यक्षपदी कल्याणराव आवटे यांची तर जिल्हा संघटकपदी काशिनाथ हांडे, सहसंघटक नाना महाजन, सहखजिनदार किशोर वडनेर,जिल्हा कार्यकारीणी सद्स्य जे. एस. देवरे तर परिषद प्रतिनिधीपदी शरद जाधव यांची नियुक्ती जाहिर  करण्यात आली.नव नियुक्त पदाधिकारींचा यशवंत पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.प्रारंभी तालुका सरचिटणीस मनोहर शेवाळे यानी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष चेतन महाजन यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी मावळते प्रभारी जिल्हाध्यक्ष आण्णा बोरगुडे,खजिनदार विजय बोराडे,कायदेशिर सल्लागार अॅड.शेखर देसाई,सहखजिनदार दिनकर आहेर,विनायक माळी,सुभाष सुर्यवंशी,सोशल मिडीया सेल समन्वयक किशोर जाधव,विशाल मराठे,रविंद्र पगार आदिंसह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या