Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कणकापूरला धार्मिक कुटी जळाली

दि . 03/03/2020

देवळा:- कणकापूर येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या सोन शाम गो शाळेलगत धार्मिक विधीसाठी बनवलेली कुटी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.याबाबत माहिती अशी की,तालुक्यातील कनकापुर येथील शांतिगिरी महाराजांचे शिष्य भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्या घराजवळ गो शाळा बांधली असुन त्यालगतच त्यांनी धार्मिक विधीसाठी कुटी बनवलेली आहे.या कुटीत त्यांनी आज सकाळी नित्यनियमाने पूजा केली.यानंतर या कुटीला 10 वाजता आग लागली .

या आगीत कुटी भस्मात झाली आहे.ही आग दिव्यामुळे लागल्याची माहिती शिंदे यांनी दिली.कुटीतील पेटत्या दिव्याची वात उंदराने ओढली आसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.या कुटीत असलेले इलेक्ट्रिक | एम्प्ली,लाऊडस्पीकर,टाळ मृदंग आदी साहित्यासह विधीसाठी असणाऱ्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.यात जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


ताज्या बातम्या