Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मराठी अभिनेत्रीची 6 डिसेंबर बाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी दाखल केली तक्रार..

दि . 02/03/2020

फेसबुक पोस्टमध्ये केतकीने लिहिलेल्या एका वाक्यावर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबई, 2 मार्च : आम्ही फक्त हिंदू असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो, असं म्हणत अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र याच पोस्टमध्ये केतकीने लिहिलेल्या एका वाक्यावर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क,' असं आक्षेपार्ह वाक्य अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यावर आक्षेप घेत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी भांडूप पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दिली आहे. तसंच लवकरात लवकर तिने माफी मागत ही पोस्ट डिलीट करावी, अशी मागणीही केली आहे. 


ताज्या बातम्या