Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




निमगाव येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य महोत्सव २०२० चे आयोजन.

दि . 02/03/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निमगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत तीन दिवसीय राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात रविवार दि.१ मार्च रोजी कर्मवीर काव्यवाचनाने करण्यात आली. 

स्पर्धेचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते व संस्थेचे सहसचिव डॉ व्ही.एस.मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याप्रसंगी कवी पाटेकर म्हणाले, कवीच्या अनुभव भावविश्वातून निर्माण होणारे काव्य हा वास्तवदर्शक आरसा असतो. काव्य हे कवीच्या अंतर्मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम असते. कवितेच्या माध्यमातून मानव आणि निसर्गाच्या स्थितीचे दर्शन घडते. याप्रसंगी डॉ. मोरे यांनी हिरे यांच्या कार्य कर्तुत्वाला उजाळा दिला. प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांच्या अंतर्मनातील भावविश्वाला प्रकट करता यावे हाच या काव्यवाचन स्पर्धेमागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले. या स्पर्धेत मुंबई, पुणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद यासह विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे ९५ स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी स्पर्धकांनी शेतकरी आत्महत्या, स्त्री जीवन व अत्याचार, प्रेम कविता, निसर्ग कविता, जातीयवाद, अशा विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकलीत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कवी विष्णू थोरे, संदीप देशपांडे, रविराज सोनार यांनी काम पहिले. सूत्रसंचालन डॉ.व्ही.डी.सूर्यवंशी, ए.जी.नेरकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.कल्याण कोकणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, तरुण, तरुणी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्या