Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव विज खाजगीकरणाला अधिकारी कर्मचारी यांचा विरोध.

दि . 02/03/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :शहरात दि:१ मार्च पासून विजेचे खाजगीकरण करण्यात आले असून सदरचा कंत्राट कलकत्ता येथील एका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. या खाजगीकरण विरोधात येथील वीज अधिकारी - कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीने सोमवार दि:२ रोजी वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालय, सर्कल कार्यालय तसेच पॉवर हाउस परिसरात निषेध द्वारसभा घेत आपला विरोध दर्शविला.  

यावेळी कार्यकारी अभियंता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विजेच्या खाजगीकरण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत असहकाराचा पवित्र घेतला आहे. महावितरणचे खाजगीकरण करून कामगार संघटनाना अंधारात ठेवण्यात आले असून विजेचे खाजगीकरण करून भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यायात आला. खाजगी कारणामुळे ३०० कर्मचारी व अधिकारी विस्थापित होणार आहे. तसेच ६० आउट सोर्सिंग कामगार व ३० सुरक्षा रक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. विजेचे खाजगीकरण होणार असल्याचा आदेश काढण्यात आला असला तरी कर्मचा-यांना कामाचे स्वरूप किंवा तसा लेखी आदेश देण्यात आलेला नाही त्यामुळेच खाजगी कंपनीला सहकार्य न करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. हे खाजगीकरण रोखण्यात यावे अशी मागणी कायम असून भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यावेळी आंदोलनात प्रवीण वाघ, दीपक भामरे, राजेंद्र देसले, आनंद गांगुर्डे, डी.एच.वाघ, अनिल वाघ, गणेश सूर्यवंशी आदींसह वीज कर्मचारी, अभियंते सहभागी झाले होते.


ताज्या बातम्या