Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातही क्यूआर कोड चा घोळ..

दि . 02/03/2020

देशभक्त सध्या सीएए, एनआरसी व एनपीआर प्रक्रियेवरून गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात जन्म-मृत्यू नोंदी काढण्यासाठी पालिकेत नागरिकांनी गर्दी केली आहे.पालिकेकडून वितरीत करण्यात येत असलेल्या दाखल्यांवरील माहिती व क्यूआर कोड स्कॅननंतर येणारी माहिती यात तफावत आढळून येत असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली असून, या प्रकरणाची चौकशी करून चुकीची माहिती देणारे दाखले सुधारणा करून नागरिकांना देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी असाच प्रकार मनमाड शहरात घडला होता. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यनंतर मालेगाव शहरातील काही नागरिकांनी देखील दाखल्यांवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर दाखल्यावरील माहिती व स्कॅन केल्यानंतर मिळणारी माहिती यात तफावत आढळून आली. अनेकांच्या दाखल्यावर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर परराज्यातील व्यक्ती माहिती समोर येत असल्याचे निदर्शनास आले. माजी आमदार शेख यांनीही याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर त्यांना असाच प्रकार आढळून आला आहे.
याप्रकरणी शेख यांनी पालिका आयुक्त किशोर बोर्डे यंना निवेदन दिल. शहरात सीएए व एनआरसीच्या मुद्यावरून आधीच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदोष दाखल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. क्यूआर कोड चुकीची माहिती देत असून हे घातक आहे. पालिकेने क्यूआर कोड मधील तांत्रिक दोष दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली.


ताज्या बातम्या