Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कांद्याच्या भावात घसरण झाल्याने संतप्त शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लिलाव पाडले बंद

दि . 02/03/2020

आज सोमवारी नेहमीप्रमाणे देवळा व उमराणे बाजार समितीच्या आवारात सकाळी 10 वाजता कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर भावात अचानक 400 ते 500 रुपयांची घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तसेच प्रहारच्या,  पदाधिकाऱ्यांनी कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला . केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्याची फक्त  ट्विटरवर घोषणा केली असून प्रत्येक्षात तसा कोणताही अध्यादेश काढला नाही.यामुळे कांद्याची घसरण सुरू असल्याची नाराजी शेतकर्यांनी व्यक्त असून,केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्याचा अध्यादेश त्वरित काढावा अशी मागणी  यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.अर्ध्या तासानंतर दोन्ही ठिकाणचे  लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.

देवळा:- कांद्याच्या भावात 400ते 500 रुपयांची घसरण झाल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी व प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करून  देवळा व उमराणे येथील बाजार लिलाव काही काळ बंद ठेवण्यात आले होते.उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना निवेदन देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
कांद्याच्या भावात घसरण झाल्याने संतप्त शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लिलाव पाडले बंद
देवळा बाजार समितीती सकाळच्या सत्रात जवळपास पाचशे वाहनातून कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता.याचा भाव जास्तीत जास्त 1830 तर सरासरी 1625  याप्रमाणे पुकारण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


ताज्या बातम्या