Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विज्ञानाचा वापर करुन चमत्कार केले जातात-तानाजी शिंदे

दि . 29/02/2020

 जि.प.प्रा शा.अजंग यांनी विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांचे प्रतिपादन,विज्ञानाचा वापर करुन बुवाबाजी कशी केली जाते हे सप्रयोग सांगितले तसेच कोणतीच वेळ अशुभ नसते हे सांगुन शिवरायांनी अमावश्या अशुभ मानली असती तर कधीच किल्ले जिंकले नसते कारण अंधाराचा फायदा घेऊन गनिमी काव्याचा वापर करून ते शत्रूला जेरीस आणत शिवाजी महाराज यांनी कधीच अंधश्रद्धा मानली नाही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालले तर आयुष्याचे सोनं होईल असेही ते म्हणाले,
ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा वाढल्यामुळे अनेक लोक बुवाबाजीकडे वळत आहेत यात अनेक सुसंस्कृत लोकंही अंधश्रद्धेतस खतपाणी घालतात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमामुळे समाजात जागृती होवुन राष्ट्रीय कार्यासही हातभार लागतो व वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी मदत होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला त्यांना अनेक प्रयोग दाखवले व शिकवले, अंगात देवी कशी येते हे   अतिशय मनोरंजक पध्दतीने त्यांनी स्पष्ट केले , शिंदे यांचा सत्कार विज्ञान शिक्षक विशाल मिसर यांनी  केला.
चुंबकाचे प्रकारातुन होणारी फसवणूक  तसेच दोऱ्यां एकमेकांत अटकवणे, कागदावरील चम्मच वाकडा करुन दाखवणे असे अनेक चमत्कारीक प्रयोग करुन सर्व विद्यार्थींना हसत ठेवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देवरे  यांनी केले व प्रकाश जाधव यांनी आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आक्का ठाकूर ,मीरा देवरे,पूनम मिसर,मधुमालती पगार,अरूणा मोरे,जयश्री जाधव,संगिता निकम,मंगला देवरे,वसुंधरा गायकवाड ,पुष्पा पवार,कल्पना हाडपे,दीपा भामरे,चित्रा शेलार,योगेश अहिरे यांनी प्रयत्न केले 
 राष्ट्रगिताने कार्यक्रमाची  सांगता झाली.


ताज्या बातम्या