Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महेश नगर मध्ये माजी नगरसेवकाच्या निवस्थानावर गोळीबार ; गेल्या महिन्याभरतील ४ घटना , पोलिसांचा वचक गेला कुठे..

दि . 27/02/2020

मालेगाव शहरातील मोसम पूल परिसरातील महेश नगर या दाट वस्तीत  काही अज्ञात  येथील माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर रात्री 2 वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

मालेगावात मध्यरात्री माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार - आरोपी CCTVत कैद , गेल्या महिन्याभरातील दोन खुण आणि चार वेळेस बंदुकीच्या घटनांनी मालेगावातील पोलीस यंत्रणेच्या कामकाज प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रिजवान खान व त्यांची पत्नी हे दोघेहे माजी नगरसेवक असून ते मालेगावातील महाविद्यालयात शिक्षक आहेत. या घटनेतील आरोपींनी जवळपास सात ते आठ गोळ्या झाडल्या असून दोन जन असल्याचे त्यांना लक्षात आले. दोघे बंदुकधारी यांनी गेटवरून उडी मारून त्यांच्या घराची बेल वाजवली रिजवान खान यांनी आतील दरवाजा उघडताच त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांना दरवाजा उघडू दिला नाही. त्यामुळे आलेल्या दोघेही आरोपींनी गोळ्या झाडायला सुरवात केली आणि घराच्या चारही बाजूला सहा ते सात गोळ्या झाडून दरवाजाही तोडण्याचा पप्रयत्न केला. रिजवान खान यांनी शेजारच्या घरी फोन करून हा प्रकार सांगताच त्यांनी लगेचच पोलिसांना कळवले आणि पोलीस गाडीचा आवाज येताच या दोघेही बंदुकधाऱ्यांनी पलायन केले.

या घटनेवरून शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात अवैध धंदे पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले असल्याने गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले असल्याचे गत आठवड्यातील घटनांनी व खुद्द विशेष पोलीस पथकाने केलेल्या कारवाईने अधोरेखित केले आहे.त्यामुळे शहरात पोलिसिंग नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

खान यांनी त्वरित दूरध्वनीवरून घटनेची माहिती शहर पोलिसांना कळवताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे,उपअधीक्षक रत्नाकर नवले आपल्या फौजफाट्यासह  घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी संपूर्ण निवासस्थानाची पाहणी केली.यावेळी 6 बंदुकीच्या रिकामी काडतुसे सापडून आल्या आहे.या प्रकरणी पहाटे पर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.आलेले दोघे इसम हे CCTV कैद झाले असून पोलिसांना याप्रकरणी अधिक तपास करण्यास याद्वारे मोठी मदत मिळणार असून आरोपींचा शोध लवकरच होईल अशी आशा खान यांनी व्यक्त केली आहे.


ताज्या बातम्या