Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजू शिरसाठ

दि . 24/02/2020

देवळा प्रतिनिधी राकेश आहेर- देवळा तालुक्यातील मेशी येथे राजू शिरसाठ यांची  नुकतीच शिर्डी येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली . प्राध्यापक संदीप जगताप यांची संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी तर राजू शिरसाठ यांची नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवडीचे पत्र देण्यात आले . ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाठ हे मूळचे मेशी येथील असल्याने येथील ग्रामस्थांनामार्फत मेशी येथील जगदंबा माता मंदिरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी देवळा पंचायत समितीचे माजी उपसभापती केदा शिरसाठ . मेशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भिका बोरसे . माजी सरपंच बापू जाधव . शाहू शिरसाठ . संजय बोरसे . हिरामण शिरसाठ . श्रीराम बोरसे .देवाजी जाधव . तुषार शिरसाठ . मोतीराम शिरसाठ . समाधान गरुड पवन गरुड . आदी ग्रामस्थ उपस्थित होते

 ग्रामीण भागातील देवळा तालुक्यातील खेडे गावात मेशी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा अध्यक्षपदाचा बहुमान हा पहिल्यांदाच एक तरुण युवा शेतकऱ्याने मिळाल्यामुळे आम्हा गावकऱ्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे त्यांनी वेळोवेळी समाजकार्य . शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रखरपणे आंदोलने करून त्यात आपला नेहमीच सहभाग नोंदविला आहे

 पंचायत समिती सभापती केदा शिरसाठ .

 शेतकऱ्यांच्या सर्व  स्तरावरच्या प्रश्नांवर प्रखरपणे आपले मत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायमच क्रियाशील राहील व सर्व जेष्ठांच्या मार्गदर्शनाने गावातील युवकांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न कसे मार्गी लावता येतील हा एक प्रयत्न राहील मला या  मिळालेल्या जिल्हा अध्यक्ष पदाचे तालुक्यासाठी व गावासाठी नक्कीच या संधीचं सोनं करेल.
राजू शिरसाठ- स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष.


ताज्या बातम्या