Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनमाड चौफुली येथे कुंटणखान्यावर विशेष पोलिस पथकाचा छपा..

दि . 20/02/2020

मालेगाव :- शहरातील किल्ला पोलीस ठाणे हद्दीतील मनमाड चौफुली येथे एका हॉटेल मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकीत एकासह पिडीत तरुणीला ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंग व अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल बुधवार दि.१८ रोजी येथील विशेष पोलिस पथकाचे सपोनी सागर कोते यांच्या पथकाने सदर कारवाई केली. मनमाड चौफुली येथील सुयश लॉज येथे  रवींद्र राजधर मगर (४०) रा.साकुर ता.मालेगाव व चालक अंकुश चंदीले रा.कलेक्टर पट्टा हे गरीब व गरजू मुली यांच्या कडून स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या कडून अनैतिक व्यापार करीत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी रवींद्र मगर व पिडीत महिलेस पथकाने ताब्यात घेतले असून किल्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चालक अंकुश हा फरार झाला आहे. या पथकात पोशी तुषार आहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, समाधान सानप, देवरे, सुर्यवंशी आदींचा समावेश होता.


ताज्या बातम्या