Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तालुक्यातील तलाठी कार्यालयात आलेत लॅपटॉप प्रिंटर पण, तहसील कार्यलयाच्या रिक्त पदांचे काय ; कर्मचाऱ्यांवर पडतोय ताण

दि . 17/02/2020

मालेगाव तालुक्यातील तलाठी सजा साठी शासनाकडून ६७ लॅपटॉप , प्रिंटर पाठवण्यात आले असून शासनाचे काम अतिशय वेगाने आणि संगणीकृत होऊन कामाला गती मिळावी असा त्यामागचा शासनाचा उद्देश आहे. लवकरच लॅपटॉप प्रिंटर चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहशीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिली. ५४ सजा असून ३९ तलाठी आणि ९ मंडळाधिकारी मालेगाव तालुक्यात कार्यरत आहेत. संगणीकृत उतारे झाले असून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. गेल्या तीन वर्षांपासून ७/१२ संगणकीकृत काम हे तलाठी स्वतः च्या खर्चातून कॉम्प्युटर च्या सहाय्याने करीत होते. आता शासनाने त्यांना लॅपटॉप प्रिंटर दिल्याने काम अधिक सुसूत्रता येईल असे राजपूत यांनी सांगितले.
पण, मालेगाव तहसील कार्यालयात नायब तह्शीलदार सह ९ पदे रिक्त झाल्यामुळे असलेल्या कर्मचार्‍यावर कामाचा ताण वाढत आहे. परिणामी नागरीकांचे कामे खोळंबून राहत आहेत व नागरीक यामुळे त्रस्त झालेले आहेत. उत्पन्नाचा दाखला असो की, जातीय दाखला, संजय निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा जन्म तारखेच्या नोंदीची माहिती घेणे असो अशा एक नाही अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी तहसील कार्यालयामार्फत केल्या जाते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अगदी तालुक्याच्या टोकावर राहणारा गाव खेड्यातील माणूस शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तिचा लाभ मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयात येतो. मात्र तहसील कार्यालयात मंजुर पदापैकी जवळपास नऊ पदे रिक्त असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मालेगाव तहसीलमध्ये नायब तहसीलदार दोन पद असून यामध्ये एक रिक्त आहे. अव्वल कारकुनची मंजुर आठ पदे असून दोन रिक्त आहेत, लिपिक टंकलेखकची मंजुर अठरा पदे असून सहा रिक्त आहेत. तलाठी ५४ मजूर पडे असून १५ पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकारी नाशिक यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
या रिक्त पदांमुळे कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यामुळे सध्या करत असलेले काम आणि त्यातच दुसरीकडील पदभारामुळे कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनातील बहुतांश कामकाज अतिरिक्त पदभारावरच चालत असल्याचे दिसून येत आहे.

 


ताज्या बातम्या