Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने डि.के. इंदोरीकर महाराजांचे कीर्तन व शौर्य पुरस्कार वितरण सोहळा..

दि . 17/02/2020

बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने दिनांक १८ फेब्रुवारी २०२० मंगळवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता डि के कॉर्नर, सोयगाव. येथे प्रख्यात कीर्तनकार श्रीमान ह. भ. प. इंदूरीकर महाराजांचा जाहीर कीर्तनाचा व शौर्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मंगलमय प्रसंगी व स्वर्गीय मुन्ना बच्छाव, सोयगाव. यांचे पुण्यस्मरणार्थ हा सोहळा संपन्न होत आहे, मागच्या वर्षी आपणा सर्वांच्या आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०१९ रोजी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते आपल्या बाराबलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने भीषण दुष्काळामुळे चार टँकर दोन वैकुंठ रथ व दोन शव पेट्या लोकार्पण करण्यात आल्या होत्या, त्याच प्रसंगी सैनिकांचा व गुणवंत शेतकऱ्यांचं देखील सन्मान करण्यात आला होता.
प्रख्यात समाज प्रबोधक किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा विरोध करणार्यांचा निषेध निषेध निषेध
इंदुरीकर महाराजांचे कीर्तनातील वक्तव्याला आक्षेप घेण्यात आला. इंदुरीकर महाराज जे काही वाक्य बोलले आहेत ते अधांतरी बोललेले नाहीत ते अभ्यासपूर्ण  किंवा कुठल्यातरी धार्मिक ग्रंथ इत्यादींचा आधार घेतल्याशिवाय बोलत नाही. महाराजांच्या वाक्यावर आक्षेप  घेऊन, शंका घेऊन टीकाटिपणी करून तसेच महाराजांचे वाक्य तोडून मोडून दाखवून फुकट ची प्रसिद्धी घेऊ नये. महाराजाच्या  कीर्तनाने व परखड समाज प्रबोधनामुळे कित्येकांच्या समस्या अज्ञान दूर झाले त्यांच्या कीर्तनात दारू मुक्ती, व्यसनमुक्ती, हुंडा, विवाह समस्या, सासु सुना मधील वाद-विवाद, अति राजकारण, चुकीचे प्रेम प्रकरण अशा अनेक ग्रामीण समस्यावर जबरदस्त विनोदी अंगाने मांडावयाचे कसब आहे. त्याच्यामुळे  बरेच संसार वाचले, फुलले, मुलं-मुली घरात राहिले, म्हाताऱ्या आई वडिलांचे संगोपन होत आहे, पालक सुखी झाले त्यामुळे शब्दांचा बातांचा बतंगड करू नये ज्यांना मान्य नसेल त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे व त्यांच्या इतर सुंदर समाज सूधारक प्रबोधनना कडे लक्ष देऊन ते आत्मसात करावे. जे जाणून-बुजून टारगेट करत असतील महाराजांना बदनाम करत असतील त्यांचा आम्ही बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने जाहीर निषेध करतो व बाराबलुतेदार महाराजांचा आम्ही आदर सन्मान करतो, व त्याच अनुषंगाने बाराबलुतेदार मित्र मंडळाच्या  प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने प्रख्यात कीर्तनकार ह. भ. प. इंदूरीकर महाराजांचे कीर्तन व काही उल्लेखनीय धाडसी सद्गुणी व्यक्तींचा शौर्य पुरस्कार देऊन आपण बाराबलुतेदार मित्र मंडळ तर्फे घर बांधणे कामी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये चा धनादेश व साडी-चोळी सन्मानचिन्ह इत्यादी देऊन सन्मान व गौरव करीत आहोत.
श्री. रामदासजी मदने राहणार- दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली. वय- 55 वर्ष, यांचे कोयना- कृष्णा नदीच्या संगमानजीकच यांचे गाव आहे, आत्ताच सांगली,कोल्हापूर येथे येऊन गेलेल्या महापुरात त्यांचे स्वतःचे घर पाण्यात बुडालेले असताना कुठलीही तमा न बाळगता त्यांनी केवळ आपल्या डोंगी होडीतून वन मॅन आर्मी बनुन सात दिवस जिथे मिलिट्री पोहोचू शकली नव्हती, तेथे हे संरक्षक जॅकेट तर सोडा साधा रेनकोट ही नाही अशा परिस्थितीत पुराच्या विळख्यात अडकलेल्या, संपर्क तुटलेल्या वाड्या वस्तीपर्यंत जाऊन माळ्याची वाडी आणि जुने गोगाव येथे दीड किलोमीटर आत पाण्यात जाऊन सुमारे ४०० ते ५०० अबाल वृद्ध लोकांना बाहेर काढून आणले. कर्नाटक येथील सेवाभावी संस्थेने चांदीचा बेल्ट देऊन सत्कार केला, त्यांच्या भागातील लोकप्रतिनिधींनी ३० हजार रुपये रोख देऊन सन्मान केला, एबीपी माझा ने सन्मान केला. आपण आपल्या बाराबलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने घर बांधण्यासाठी रुपये २५ हजार चा धनादेश व साडीचोळी सन्मानचिन्ह देऊन सन्मान करत आहे.
श्रीमान अंकुश गोयकर, भवानी वाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद. हे पोलिओच्या आजाराने कमरे पासून खाली दोघं पाय लुळे पडलेत सरपटत जाऊन नववीपर्यंत शाळा शिकलेत, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शाळा सोडली, अपंग असल्याने सहानुभूती किंवा अपंगाचे निमित्त करून अंकुश भाऊ बसून किंवा भीक मागून उदरनिर्वाह करू  शकले असते, परंतु त्या अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने मोठ्या कष्टाने व मेहनतीने आपला मुका प्राणी जिवलग मित्र भुजा बैलाच्या सहकार्याने अंकुश मोठ्या कष्ट मेहनतीने आणि स्वाभिमानाने आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत, ही मोठी कौतुकास्पद व इतर धडधाकट आई-वडिलांच्या जीवावर बसून खाणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देणारी बाब आहे, आपल्या अपंगत्वावर मात करून आपल्या मुक्या प्राणी भोज्या बैलाच्या सहकार्याने अंकुश रुबाबात व स्वाभिमानाणे जगत आहे, त्याबद्दल त्यांना घरबांधणीसाठी पंचवीस हजार रुपये चा धनादेश साडीचोळी व सन्मानचिन्ह देऊन आपल्या बाराबलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करीत आहोत.
कुमारी निकिता रमेश सोनवणे राहणार अजंग, ता. मालेगाव, दिनांक २४ ऑक्टोबर २०१७ रोजी अजंग येथे शेतमजुरीचे काम आटोपून 22 महिला ट्रॅक्टर ट्रॉली मधून संध्याकाळी घरी परत येत होत्या, अजंग गाव तलाव पाण्याने तुडुंब भरलेला असताना पाण्यामुळे रस्ता खचला व ट्रॅक्टरसह ट्रॉली पाण्यात पलटी झाली, सदर भयंकर अपघातात 22 पैकी साथ महिला पाण्यात बुडून गतप्राण झाल्यात कुमारी निकिताने साधारण पोहता येत असताना स्वतःच्या आईसह इतर सात ते आठ महिलांचे प्राण वाचवले विशेष म्हणजे ड्रायव्हर व काही स्त्रिया भीतीने तिथून पळून गेल्या, परंतु निकिताने तिथेच थांबून कोणाला हात धरून कोणाचे केस ओढून जसं जमेल तसं पाण्यात पोहत जाऊन ओढून आणले वडील नसताना आई विधवा, घर नाही, मजुरी करून दोन्ही मायलेकी पोट भागवतात निकिताच्या धाडसी कार्यकर्तृत्व बद्दल तिला घर बांधण्यासाठी रोख 25 हजार रुपये साडी-चोळी व सन्मानचिन्ह देऊन बारा बलुतेदार मित्र मंडळातर्फे तर्फे गौरव सन्मान करीत आहोत.


ताज्या बातम्या