Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दहावीचे वर्ष हे महाद्वार ते ओलांडण्यासाठी मेहनत घ्या – डॉ. विनोद गोरवाडकर

दि . 15/02/2020

शाह माध्यमिक व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी बारावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

मालेगाव – येथील  वर्धमान शिक्षण संस्था संचालित श्री र. वी. शाह माध्यमिक व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ 10 वी व इ 12 वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक साहित्यिक डॉ. विनोद गोरवाडकर हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक पटणी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री परेश शाह, सचिव श्री प्रताप शाह, सहसचिव श्री गौतम रमेशचंद्र शाह, श्री गौतम प्रकाश शाह, सहकोषाध्यक्ष श्री पद्मेश मेहता, प्राचार्य श्री संजय दत्तात्रय बेलन, पर्यवेक्षक श्री व्ही.एन.कासार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीपूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी गरुड गमन व ईशस्तवन सादर केले. यानंतर संस्थेचे सचिव श्री प्रताप शाह, सहसचिव श्री गौतम प्रकाश शाह व सहकोषाध्यक्ष श्री पद्मेश मेहता त्यांनी विद्यार्थ्यांना मागर्दर्शन केले. गेल्या दहा ते बारा वर्षापासून या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात दहावी व बारावीचे वर्ष हा टर्निंग पोइंट असून अथक परिश्रम व मेहनतीने या परीक्षेत यश मिळवावे व वर्धमान शिक्षण संस्थेच्या संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन भविष्यात यशस्वी वाटचाल करावी. पालकांसह, शाळा, संस्था व देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले. यावेळी सचिव श्री प्रताप शाह यांनी दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच येणा-या विद्यार्थ्यांना संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात मोफत प्रवेश दिला जाईल अशी घोषणा यावेळी केली. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या विविध कायमस्वरूपी व वैयक्तिक बक्षीस योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. उपाध्यक्ष श्री परेश शाह, सहसचिव श्री गौतम रमेशचंद्र शाह यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. प्राचार्य श्री संजय बेलन यांनी देखील परीक्षेचे दडपण घेऊ नका. गैरमार्गाचा अवलंब करू नका असे आवाहन केले. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. विनोद गोरवाडकर यांनी मागदर्शन करतांना विविध उदाहरण व दाखले देत यशाची सूत्रे विद्यार्थ्यांना सांगितली. ते म्हणाले की, वर्धमान शिक्षण संस्थेत केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नसून विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी दिली जाते आहे. शालेय जीवनात दहावी हे महाद्वार असते त्यापलीकडे ख-या अर्थाने संधीचे अवकाश असते परंतु हे महाद्वार ओलांडणे सोपे नसून त्यासाठी कठोर परिश्रम व मेहनत विद्यार्थ्यांनी करावी. शिक्षकांनी तुमच्यावर घेतलेल्या मेहनतीचे फळ तुमच्या परीक्षेतील चांगल्या यशाने त्यांना मिळते. शिक्षकांची भूमिका केवळ मार्ग दाखवण्याची असून तुम्हाला त्या वाटेवरून दृढ निश्चयाने चालायचे आहे. त्यासाठी देवाने दिलेल्या २४ तासाच्या दिवस म्हणजे एक कोरा कागद असून त्यावर आपल्या यशाचे चित्र रेखाटन करा. समर्पण भावनेने अभ्यास करा असे सांगताना त्यांनी आई वडिल गुरुजनांविषयी विषयी कृतज्ञ राहा, निसर्गावर प्रेम करा, पुस्तकांशी मैत्री करा, बलोपासना करा, रोज एक गोष्ट चांगली करा, कॉपी करू नका, मोबाईलच्या आहारी जाऊ नका अशी यशाची सूत्रे सांगून शुभेच्छा दिल्यात. शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. एस.पी.बेलन व श्री एम.एम.पवार तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दिया खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ.एस.एस. देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती आर.एल. फडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्या