Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुकुंद थोरात यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार

दि . 12/02/2020

मालेगाव - महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्या वतीने मालवण येथे नुकतेच कलाशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत तालुक्यातील झोडगे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक मुकुंद भिका थोरात यांना राज्यस्तरिय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर, म.राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, सरचिटणीस एम.ए.कादरी, हिरामण पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.  मुकुंद थोरात यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल नासिक विभागाचे अध्यक्ष वानखेडे सर , पाटील सर, संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र भोसले ,राजेंद्र महाजन, अविनाश जाधंव, बागुल, चंद्रकांत सुर्यवंशी, प्रकाश गोतरणे यांनी अभिनंदन केले आहे. 

 

 

 
 
 
 
 
 


ताज्या बातम्या