Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ठाकरेसरकार कडून आनंदाची बातमी, शासकीय कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून शनिवार-रविवार सुट्टी..

दि . 12/02/2020

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारांना यापुढे दर शनिवार-रविवार सुट्टी मिळणार आहे. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्याला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
सत्तेवर येताच पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी  सांगितलं होतं. फडणवीस सरकारच्या काळापासूनच सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी होती. त्यासाठी निवेदनं देण्यात आली होती. कामाचा वेळ 45 मिनिटं वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसंच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं होतं.


ताज्या बातम्या