Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जि. प.सायने बु. शाळेत वार्षिक संमेलन मोठ्या उत्साहात साजरा..

दि . 11/02/2020

मालेगाव :- तालुक्यातील सायने (बू) येथील  जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मालेगाव महापालिकेचे उपमहापौर निलेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सायनेचे नगरसेवक नंदकुमार सावंत, धर्मा अण्णा भामरे, मालेगाव पंचायत समितीचे सभापती सुवर्णा देसले, उपसभापती सरला शेळके, चिखल  ओहळ केंद्राचे केंद्रप्रमुख राठोड, विजय आबा देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीते, शेतकरी आत्महत्या नाटिका, लोकगीते, आदी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम 
यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच सर्व शिक्षक वृंद आदींनी यांनी विशेष परिश्रम घेतले.  

या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला गुणांनी उपस्थितांची मने जिंकत २३ हजार ५५० या रोख रकमेची बक्षीस मिळवली. यावेळी शाळेच्या बांधकामासाठी व नवीन पत्रे खरेदीसाठी नगरसेवक धर्मा आण्णा भामरे यांचे कडून ५१ हजार तर नंदकुमार सावंत यांचेकडून ५१ हजार रुपये अशी रक्कम जाहीर करण्यात आली.


ताज्या बातम्या