Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शेतकऱ्यांच्या कर्जावर हिशोबात बँकांकडून गडबड आढळल्यास चौकशी करू ; शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार नाही आम्ही खबरदारी घेऊ-कृषीमंत्री

दि . 08/02/2020

मालेगाव: शेतकरी कर्जमाफीच्या हिशोबात बँकांकडून गडबड शेतकऱ्यांची राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले कि "शेतकऱ्यांनी कर्ज कधी घेतले आणि त्यावर व्याज किती आकारले आहे याची सखोल चौकशी करू. कोणताही शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडून प्राप्त अहवालानुसार मुख्यमंत्री, कृषी विभाग व महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊन बँकांच्या बाबतीत असे आढळून आले तर योग्य ती कारवाई करू."

राज्य शासनाच्या २ लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्ज माफी नंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर बँकांद्वारे सुरु असलेल्या हिशेबात जाणून-बुजून गडबड केली जात असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली असून या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांनी सरकारकडे एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात काही जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन ते चार पट व्याज लावत असल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत  कर्ज माफ करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांच्या कर्जापोटी अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडे केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे.मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकी  असलेल्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबमध्ये जाणून-बुजून गडबड केली असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला असून यात काही जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन ते चार पट व्याज लावल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

 

 


ताज्या बातम्या