Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
साठ फुटी रोडवरील गोल्ड कॅफे शॉप वर छावणी पोलिसांचा छापा ; अश्लील वर्तन करणारे १२ मुल-मुलींसह चालक ताब्यात..

दि . 07/02/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील ६० फुटी रोडवर असलेल्या बालाजी आरकेड या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या गोल्ड कॅफे शॉप मध्ये महाविद्यालयीन मुल-मुली एकमेकांना भेटण्याच्या उद्देशाने शॉपमध्ये बसून अश्लील वर्तन करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छावणी पोलीसानी आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास या कॅफे हाऊसवर छापा टाकला. यावेळी कॅफे शॉपमध्ये बसून अश्लील वर्तन करताना १२ अल्पवयीन मुला मुलीसह पोलिसांनी कॅफे चालकाला ताब्यात घेतले.

शहरातील ६० फुटी रोडवरील या कॅफे शॉपच्या नावाने सुरु असलेल्या हॉटेलमध्ये महाविद्यालयीन मूल मुली अश्लील वर्तन करीत असल्याची गोपनीय माहिती छावणी पोलिसांना मिळाली होती. या नुसार आज शुक्रवार दि.७ रोजी येथील छावणी पोलिसांनी या गोल्ड कॅफे शॉपवर छापा टाकला. यावेळी सदर कॅफे शॉप मध्ये बसलेले काही महाविद्यालयीन मुलं मुली अश्लील वर्तन करीत असताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी कॅफे चालक महेश नाना पवार व वैभव विकास काथेपुरी यांच्यासह १२ मुला - मुलींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत सदर मुलां मुलींना समन्स देऊन सोडून देण्यात आले. तर कॅफे चालक मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे काम उशिरा सुरु होते. छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस शिपाई संदीप राठोड, नितीन बाराहाते, मनीषा शिंदे, स्वप्नील पाटील आदींनी सदर कारवाई केली. मागील महिन्यात देखील अश्याच प्रकारच्या काही शॉप वर कॅम्प पोलिसांनी डीके चौकात कारवाई करीत मुला मुलींना ताब्यात घेतले होते. मात्र या कारवाई नंतर देखील या महाविद्यालयीन मुला मुलींना कोणाचाच धाक नसल्याचे निष्पन्न होते. पोलिसांनी देखील अश्या कारवाया वेळीच केल्यास अश्या प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक राहील.


ताज्या बातम्या