Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शहरातील वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका रद्द करा अन्यथा आत्मदहन करणार ; सामजिक कार्यकर्ता गणी शाह यांचा इशारा..

दि . 06/02/2020

मालेगाव :- शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेने अटी व शर्तीच्या आधारे वॉटरग्रेस कंपनीस कचरा उचलण्याचा ठेका दिला असूनही शहरातील कचरा उचलला जात नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर कंपनीचा ठेका रद्द करावा यासाठी सामाजिक संस्थेसह नगरसेवकांनी वेळोवेळी निवेदन देत आंदोलन देखील केली. तत्कालीन आयुक्तांनी यासाठी समिती गठित करीत सदर या विषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अहवाल सादर होऊन देखील अहवालानुसार सदर मक्ते दाराचा ठेका रद्द करण्यात आला नसून येत्या सात दिवसात या कंपनीच्या ठेकेदारावर कारवाई करून ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी सामजिक कार्यकर्ता गनिशाह जानू शहा यांनी निवेदनाद्वारे दिली असून सदर निवेदन पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.   

 शहरातील कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने अटी व शर्तीनुसार वॉटर ग्रेस कंपनीस ११ वर्षासाठी ठेका दिला आहे. त्यानुसार कंपनीने शहरातील दैनंदिन कचरा जमा करून तो महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर टाकावा असे ठरले आहे. कंपनीला स्वच्छतेचा ठेका देवून देखील शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रभागातील कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. त्यामुळे कंपनीचा ठेका रद्द करावा अशी मागणी शहरवासिय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती. तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांनी वॉटर ग्रेस कंपनी विरोधात वेळोवेळी दाखल होत असलेल्या तक्रारीनुसार समिती गठीत करत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. समितीने दिलेल्या चौकशी अहवालानुसार वॉटरग्रेस कंपनी आपल्या कामात कामचुकारपणा करीत असून नियमांचे पालन करीत नसून अहवालानुसार वॉटरग्रेसचा ठेका त्वरित रद्द होऊ शकतो हे स्पष्ट होते. तरी सदर ठेका रद्द करण्याचे आदेश देण्यात येऊन मनपाचे निष्क्रिय आयुक्त किशोर बोर्डे यांना बडतर्फ करण्यात येऊन आय ए एस दर्जाचे अधिकारी मालेगाव महापालिकेत नियुक्त करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका सात दिवसात रद्द करावा अन्यथा सात दिवसांनंतर येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील गणी शाह यांनी दिला आहे.


ताज्या बातम्या