Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जानेवारी संपला तरी कांदा लागवड सुरूच..

दि . 06/02/2020

देवळा प्रतिनिधी राकेश आहेर : देवळा तालुक्यात अजूनही कांदा लागवड पूर्ण झाली नाही, दरवर्षी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात देवळा तालुक्यातील कांदा लागवड पूर्ण होत होती, परंतु यावर्षी पावसाळ्याच्या शेवटी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता त्यामुळे शेतकऱ्यांची उन्हाळ कांदा रोप पूर्णतः खराब झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन कांदा बियाणे घेऊन रोपे तयार केली व अद्यापही कांदा लागवड सुरूच आहे अजून साधारण १५ दिवस कांदा लागवड चालतील असा अंदाज आहे.

    मागच्या वर्षी देवळा तालुक्यात भीषण दुष्काळ पडला होता त्यामुळे बहुतेक शेतकरी उन्हाळ कांदा पासून वंचित राहिले होते, पण यावर्षी सगळीकडे चांगल्या पावसाची नोंद झाली त्यामुळे सर्वच शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर मध्ये लाल कांद्याला चांगला दर मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीवर जास्त भर दिला आहे.
    *यावर्षी कांद्याचे भवितव्य धोक्यात जाणार काय?*_मागील वर्षी उन्हाळ कांद्याला तसेच पावसाळी लाल कांद्याला चांगला दर मिळत होता, पण सरकारने कांदा भाव वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी केली त्याचे परिणाम थेट कांद्याच्या दरात बघायला मिळाले 100 ते 120 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 8 ते 15 रुपये किलोवर येऊन ठेपला आहे, त्यातच यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड भरपूर प्रमाणात असल्याने येणाऱ्या काळात सरकारने जर निर्यात खुली केली नाही तर..‌ शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जाईल आणि विकलेल्या कांद्यातून उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही यात तिळमात्र शंका नाही.


ताज्या बातम्या