Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
काकाणी विद्यालयात गैरमार्गाशी लढा विषयावर व्याख्यान

दि . 06/02/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- येथील काकाणी कन्या विद्यालयात गुरुवार दि.६ रोजी कॉपीमुक्त अभियानांतर्गत ‘गैरमार्गाशी लढा’ या विषयावर, संस्थेचे सेक्रेटरी सतीश कलंत्री यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कलंत्री यांनी स्वरचित शाळा ही कविता सादर केली.

यावेळी मुख्याध्यापिका शोभा मोरे, पर्यवेक्षक राजेश परदेशी, योगेश शिरोडे व अनिल आघारकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मोरे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना कलंत्री यांनी यशाच्या खडतर मार्गावरून चालणाऱ्या अनेक यशस्वी व्यक्तींची उदाहरणे दिली. परीक्षेची भीती घालवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, सातत्य ही यशाची त्रिसूत्री अंगीकारण्यास सांगितले. स्वत:ला कणखर बनविण्यासाठी संकटांना सामोरे जा असे आवाहन करीत यशाचा मार्ग हा सत्याचा व सचोटीचा असून सकारात्मकतेने विचार करून वाटचाल करावी, असा प्रोत्साहनपर उपदेश दिला. शेवटी पर्यावरणाच्या स्वच्छतेचा संकल्प घेऊन भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय येवले यांनी केले.


ताज्या बातम्या