Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात बत्तीगुल आंदोलनास नागरीकांचा प्रतिसाद

दि . 05/02/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याविरोधात येथील दस्तूर-ए-हिंद बचाव कमिटीच्यावतीने काल  बुधवारी दि.४ रोजी संपूर्ण शहरात बत्ती गुल आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान वीज पुरवठा बंद करून या अनोख्या आंदोलनास पाठींबा दिला.

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रीये संदर्भातील कायदे केले आहेत. या कायद्याविरोधात नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून संपूर्ण देशात या कायद्याविरोधात आंदोलन केले जात आहे. केंद्र सरकारने सदर कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी काल मालेगाव शहरात मौलाना उमरेन यांच्या नेतृत्वाखाली बत्तीगुल आंदोलन करण्यात आले. सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान शहरातील मोहमद अली रोड, मिर्झा गालिब रोड, जूना आग्रा रोड, सुपर मार्केट, किदवाई रोड आदींसह शहरातील विविध भागातील सर्व दुकाने, कारखाने, व्यापारी संकुल, घरे येथील वीज बंद ठेऊन अंधार करत नागरीकांनी आंदोलनास पाठींबा दिला. या आंदोलनाला अब्दुल अजीम फलाही, शफीक राणा, मौलाना फजहूर रहमान यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन विचार, रिक्षा युनियन यांनी पाठींबा दिला होता.


ताज्या बातम्या